STORYMIRROR

Pradip Joshi

Others Children

4  

Pradip Joshi

Others Children

कविता... मला पुन्हा एकदा शाळेत

कविता... मला पुन्हा एकदा शाळेत

1 min
469

मला पुन्हा एकदा शाळेत जायचय

मला पुन्हा एकदा शाळेत जायचय.

धावत जाऊन माझ्या बाकावर बसायचय

खड्या आवाजात शालागीत म्हाणायचय

नितांत सुंदर या माळावर सुरेख आमची शाळा

छान अक्षरात वहिवर आपल नाव लिहायचय

मला पुन्हा एकदा शाळेत जायचय.।।


मधली सुट्टी होताच नळाखाली पाणी प्यायचय

कसाबसा आईने दिलेला डबा संपवायचाय

तिखट मीठ लावलेल्या चिन्चा, बोर, पेरु खायचय

पुन्हा एकदा मैत्रिणीशी गप्पा मारायच्यात

मला पुन्हा एकदा माझ्या शाळेत जायचय.।।


ओम तेजस्वी नावधीतमस्तू अनुभवायचय

गुरुजनांचे ते संस्कारक्षम बोल ऐकायचेत

अनपेक्षित मिळणाऱ्या सुट्टीचा आनंद लुटायचाय

मला पुन्हा एकदा शाळेत जायचय.।।

घन्टा होईपर्यंत मैत्रिणीशी गप्पा मारायच्यात

रेस लावून जोशी क्लासेसला जायचय

मला पुन्हा एकदा शाळेत जायचय.।।


जबाबदारी च्या ओझ्यापेक्षा दप्तराचे ओझे हवंय

मैत्रिणीशी हसत खेळत शाळेचा रस्ता धरायचाय

खरंच मला पुन्हा एकदा शाळेत प्रवेश घ्यायचाय।।


Rate this content
Log in