STORYMIRROR

Pradip Joshi

Romance

3  

Pradip Joshi

Romance

ती सध्या काय करते

ती सध्या काय करते

1 min
298

लहानपणी माझ्याबरोबर बागडणारी

माझ्या जवळच्या बाकावर बसणारी

सर्वांची नजर चुकवून खुणा करणारी

माझ्याबरोबर टिफिनचा आस्वाद घेणारी

कोण सांगेल का ती सध्या काय करते।


माझ्याशी रोज प्रेमाच्या गप्पा मारणारी

खास गुलाबी पत्रातून प्रेम व्यक्त करणारी

माझ्या हृदयात जागा मिळवणारी

अभ्यासात मला बरोबर घेऊन जाणारी

कोण सांगेल का ती सध्या काय करते।


आयुष्यभर साथ देण्याचं वचन देणारी

दिलेलं वचन पाळण्यासाठी धडपडणारी

मनात नसताना दुसऱ्याशी संसार थाटणारी

मला पुन्हा भेटण्यासाठी आतुर झालेली

कोण सांगेल का ती सध्या काय करते।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance