STORYMIRROR

Archana Rahurkar

Inspirational

4  

Archana Rahurkar

Inspirational

जीवनाचे ध्येय

जीवनाचे ध्येय

1 min
622

ध्येयाविना जीवनास न अर्थ

अन्यथा सगळेच असे व्यर्थ

ध्येय असेल तर उद्याचे स्वप्न

साकारण्याचा ध्यास नि आस

           

जीवाची ती धडपड नि तगमग

यशाचे शिखर गाठण्यास वडवड

किती आल्या अडीअडचणी तरी

जिद्द, चिकाटी असावी अंगी खास


स्वप्नांच्या गावा जावे चढत शिखर

उन्हाळे पावसाळे झेलत सोसत 

करावे पार ते हासत हासतच

यश मिळाले तर नावलौकिक

जीवन जगण्याची ती एक रीत

‌ध्येय मनी असावे जीवनास मर्म

‌कष्ट करण्याची तयारी राहावे सतर्क

जीवन होई सार्थ कळेल ध्येयाचा अर्थ


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational