STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Inspirational

4  

NIKHITA DAKHORE

Inspirational

मी...

मी...

1 min
159

अनेक आली संकटे

वा येवो दुःखे अनेक

तरी मी हसणं सोडणार नाही...


करेल प्रहार मी वाईट प्रवृत्तीवर

जीव जाइस्तोवर 

गुलामगिरीच्या बेड्या

मी घालणार नाही......


दिली जातील अामिषे अनेक 

फुटेल पाझर नयनांना 

तरीही या वाळवंटात 

मैत्रीचा सुगंध दरवळणार नाही......


केल्या सहन मी अनेक यातना 

करेल सहन वेदना 

तोडली गेली जरी लेखणी माझी

तरीही मी हरणार नाही......


दुःखाचे ढग जरी 

अश्रू बनुनी आले 

तरी त्यांची बंदिस्त मी होणार नाही.... 

        

 मी हसत राहील....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational