STORYMIRROR

RUTUJA BHAGAT

Inspirational

3  

RUTUJA BHAGAT

Inspirational

पुस्तक

पुस्तक

1 min
11.4K

रडले की तू आठवतोस

हसले की तू आठवतोस

विचारातही तूच असतोस

कृतीतही तूच घडतोस....


मनात तू कायम साठून राहतोस

भावनांमध्ये दाटून येतोस

वळणावळणावर खुलवत राहतोस

जगणे हे माझे फुलवत राहतोस....


कोणीच नसले तरी तू असतोस

काहीच नसले तरी तूच दिसतोस

टप्याटप्यावर जाणवत राहतोस

क्षणाक्षणाला खुणवत राहतोस....


कधी डोळ्यात पाणी, कधी ओठात हसू

नकळत सगळ्यांना रमवत राहतोस

पुस्तका असा कसा रे तू???

अलगद तुझ्याच दुनियेत घेऊन जातोस....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational