कळतच नाही काही
कळतच नाही काही
कळतच नाही काही
काय चाललंय...
मनात कुठेतरी
खूप काही साचलंय...
बोलायचंय खूप काही
पण शब्द सोबत नाही...
सांगायचंय खूप काही
पण ऐकणारा चेहरा समोर नाही...
एकांताच्या सहवासातही
भावनांची गर्दी काही ओसरतच नाही...
अबोलपणाची ही बोलकी सर
कोणाला जाणवतच नाही...
घेऊन विचारांची पालवी ही
अस्वस्थता सहन होत नाही...
काय चाललंय माझं
मलाच काही कळत नाही...
