तोडून बंध हे आता
तोडून बंध हे आता

1 min

12K
बंध तोडून सारे हे आता
बेधुंद आता उडायचे आहे
हातात घेऊन स्वप्नांची पालवी
सत्यात आता फुलायचे आहे ....
झाले गेले सोडून सारे
नव्याने आता जगायचे आहे
घेऊन साथ आता स्वतःचीच
माझ्यातच मला खुलायचे आहे ....
चालताना वाटेत आता
माझेच मला सावरायचे आहे
येउ दे काटे कितीही पायाशी
सुखाच्या शोधात दुःख पाहायचे आहे ....
विचारांची तोडून साखळी
आता स्वतःसाठी फुलायचे आहे
माझ्यातल्या माझ्यासाठी मला
हे बंध आता तोडायचे आहे .....