असा हा महाराष्ट्र माझा…
असा हा महाराष्ट्र माझा…
उत्साहाचे भंडार आहे,
शौर्य आणि संस्कृतीचा अनोखा हा संगम आहे
पर्वताहुनही मोठं ज्याचं नाव आहे,
पाहुण्यांसाठी उपाशी हा राहतो आहे
गड-किल्ल्यांचे अनोखे दृश्य इथे,
वीर-धाडसी मावळ्यांची धरती आणखी कुठे
त्याग प्रेमाची कहाणी सांगतो,
सौंर्दयावर याच्या सारा जग मरतो
शाही भव्यता आहे अभिमान याचा,
मनमोहित करी मातीचा सुगंध याच्या
चंद्रालाही लाजवण्या इथले कर्तृत्वच पुरेसे,
स्वाभिमान असा की कधीही कुणापुढे न झुके
संतमहात्म्यांच्या अभंगाने मनमोहित होऊन जाई,
प्रेम ममत्वाची जाणीव हा करवून देई
अशक्यालाही शक्यात बदले,
असा हा माझा महाराष्ट्र आहे,
असा हा माझा महाराष्ट्र आहे