मैत्री
मैत्री


मैत्री असावी पावसासारखी
सरसर सरसर कोसळणारी
आकाशातून इंद्रधनुचे
सप्तरंग ते उधळणारी
मैत्री असावी मोहरणारी
बागडणारी, भिरभिरणारी
जणू दूरच्या डोंगराला वळसा
घालून थकवणारी
मैत्री असावी बडबडणारी
पक्ष्यासारखी किलबिलणारी
कधी अनामिक हाक होऊनी
साद चिऊचीही देणारी
मैत्री असावी सागरासम
सगळे विश्व व्यापून टाकणारी
कधी अथांग सागर जणू तो
कधी कोरडी विहीर व्हावी
मैत्री असावी रखरखते ऊन
नको सारखी ती आळवणी
कधी चुकीचा निर्णय घेता
रागाने ती फटकावणारी
मैत्री असावी छत्रपती शिवाजी
महाराज आणि श्री तानाजी मालुसरेंसारखी अन् तलवारीच्या
टोकासारखी
मैत्री असावी श्री शंभुशी भगव्यासाठी मर मिटणारी
इतिहासाच्या पानांवर ही
नाव आपुले मग टिपणारी......
नाव आपुले मग टिपणारी.......