जय शिवराय
जय शिवराय

1 min

11.8K
शिवनेरीवर हलला पाळणा,
जिजाऊपोटी बाळ जन्माला,
नावाने देवीच्या शिवाई,
नामकरण झाले शिवाजी
शिवनेरी ती धन्य झाली,
रायरेश्वरी शपथ घेतली,
आऊसाहेबांचे स्वप्न ते,
पूर्ण करण्या स्वारी निघाली
मराठमावळे झाले गोळा,
स्वराज्याचे तोरण बांधण्या,
प्रचंड किल्ला सर केला,
तोरणा म्हणून घोषित झाला
इंग्रज, मुघल, निजाम सगळे,
शिवरायांपुढे हे सारे नमले,
गनिमी काव्याने शिवबांनी,
किल्ले अनेक सर केले
रायगडावर रायांनी,
अखेरचा श्वास घेतला,
हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघत,
जगाचा निरोप घेतला