व्यायाम शाळा
व्यायाम शाळा
शरीर स्वस्थ राहण्यासाठी
करावा लागतो व्यायाम
व्यायाम करण्यासाठी असते
"व्यायाम शाळा"
व्यायाम शाळेत असतात
"विविध साधने"
व्यायाम शाळा असतात
शहराचं "स्वास्थ्य"
व्यायाम शाळा असतात
गावाचं "सौंदर्य"
व्यायामामुळे जातात
पळून दूर आजार
होत नाही कोणी
व्याधीने बेजार
व्यायाम शाळेत होते
शरीराची मशागत
स्वस्थ जगण्याचे मंत्र
होते हस्तगत
व्यायामामुळे वाढते
प्रतिकारशक्ती
कोरोनाला हरवण्याची
ही आहे एक युक्ती
प्रत्येक गावात, शहरात
व्यायाम शाळा असायलाच हवी
निरोगी जीवनाची हमी
प्रत्येकाला मिळायलाच हवी
कोणताही विषाणू
मग करणार नाही हैराण
प्रत्येकालाच असेल
त्याच्या निरोगी शरीराचे भान...