व्यसन
व्यसन

1 min

12K
व्यसन हे असे
क्षणिक सुखाचे
आयुष्य दुःखाचे
करिते रे
आरोग्याची हानी
रक्ताच्या त्या पेशी
मृत्यूकडे नेशी
हळूहळू
निकोटीन घुसे
तत्पर रक्तात
मरण स्वस्तात
होते मग
सिगारेट ओढी
फुफ्फुसे बिघडे
कुटुंब उघडे
पडे मग
आता तरी बाबा
दे नशा सोडून
आरोग्य जोडून
ठेव तू
बोनस आयुष्य
दिले हे देवाने
जप संयमाने
तूच आता