विदूषक
विदूषक


विदूषक सर्वांना हसवणारा
जीवनातील दुःख विसरायला
लावणारा ..........
चेहऱ्यावर रंग थोपवून
आपला खरा रंग
झाकणारा ..........
दुसऱ्यांच्या अंतरंगात डोकावून
स्वतःचे दुःख विसरणारा
खरच, तो स्वतः हसवत असतो
का फसवत असतो आपल्याला .........
त्याच्या दुःखाचा गाठोडे
बांधून ठेवलेलं असतं
त्याने करकचून
आपण हसता हसता
थोडावेळ थांबलो तर दिसेल......
त्याच्या डोळ्यातील अश्रू ,त्या वेदना ........
आणि मग समजेल आपल्याला
त्याच्या प्रत्येक हास्य मागे दडलेले रहस्य