STORYMIRROR

Meena Mahindrakar

Others

3  

Meena Mahindrakar

Others

तुझी साथ

तुझी साथ

1 min
12K

तुझी साथ मला 

हवी आहे आज 

तुझ्यासाठी खास

 जीवनात साज


 स्वप्न दोघांचीही 

 पूर्ण करूयात

 नाव पैलतीरी 

 दोघे नेवूयात


सुखदुःख दोन्ही 

सम आपल्याला 

दोघे सोबतच 

काळजी कशाला


बाग प्रेमाची ही 

फुले आनंदाने 

वाटू चोहीकडे 

गंध चैतन्याने


तुझी साथ मला 

स्वर्गसुख भासे 

सडे आनंदाचे 

माझ्या दारी हसे


साहित्याला गुण द्या
लॉग इन