विचार
विचार

1 min

65
विचार कर मना
नेहमी सत्याचे
सोडून दे सारे
बंध रे असत्याचे
सकस वाचन
विचार दर्जेदार
बोलू मितभाषी
असेल दमदार
विचाराचे तेज
मुखावर विराजे
डोळ्यातील लकाकी
आत्मभान गाजे
सकारात्मक विचार
देई आकार मनाला
नंदनवन बनवी
मानवी जीवनाला