नाजूक बंधन
नाजूक बंधन
1 min
11.3K
डोळ्यात तुझ्या
नाजूक बंधन
करिती वंदन
मनात माझ्या
अबोल आहे
प्रिया तुझी प्रीत
निराळीच रीत
भासते आहे
गोड गुपित
तुझ्या माझ्या मनी
ओळखील कोणी
ठेवू कुपीत
तुला लागला
लळा हा प्रीतीचा
सुगंध फुलाचा
भासू लागला
मिळून दोघे
फुलवू जीवन
होईल पावन
जग हे बघे
जगी देऊ या
संदेश प्रेमाचा
आपल्या मनाचा
वृक्ष लावू या