पहिला पाऊस
पहिला पाऊस

1 min

81
पहिल्या पावसाची
काय सांगू 'मजा'
पावसात भिजले म्हणून
आईने दिली 'सजा'
पहिल्या पावसाने
मन झाले 'ओलेचिंब'
पाण्यात बघते
माझेच 'प्रतिबिंब'
पहिल्या पावसाने
भारावला आसमंत
दरवळे चोहीकडे
मृदेचा तो गंध
पहिला पाऊस नेहमीच
ओळखीचे 'हसतो'
मला मात्र नेहमी
तो अनोळखी 'भासतो'