संधीचं सोनं
संधीचं सोनं

1 min

23.2K
महामारीच्या संकटाने
संपूर्ण मानव जात होरपळून गेली
कित्येकांच्या हाताचं काम गेलं
कित्येकांच्या रक्ताची नाती हरवली
अनेक कामगार आपल्या
राज्यात परत गेले
तरुणांना नवीन संधी
मात्र ते देऊन गेले
सुशिक्षित बेकार म्हणून
हिणवत होते सारे
बघाच आता चित्र
बदलेल हे वारे
गरीब-श्रीमंत सुशिक्षित-अशिक्षित
ठेवू नये कसलाच भेद
कामाची करूया पूजा
द्या आळसाला छेद
एकजुटीने करूया प्रयत्न
पुन्हा स्वप्न बघूया
भारत सुजलाम सुफलाम
सिद्ध आपण करूया
मिळेल ते काम करून
तरुणांनी लढायला हवं
मेहनत करुन संधीचं सोनं
त्यांनी करायला हवं