आई कुठे काय करते
आई कुठे काय करते
माझी चाहूल लागली
तिला लागले डोहाळे
पाणीसुद्धा पचेना
तरी पुरवले माझे सोहळे
करिअर दिल सोडून
करण्यासाठी माझं संगोपन
जपायचं होतं म्हणे तिला
माझं "बालपण "
आजारी मी असता
ती रात्र रात्र जागी
माझ्या सुख-दुःखात
ती सदैव सहभागी
मीच तीच विश्व आहे
अवतीभोवती माझ्या फिरते
मलासुद्धा वाटायचं
'आई कुठे काय करते '?
आता मी सुद्धा"आई "झाले
आई होण्यासाठीच्या प्रवासाने
"अनुभवाचे शहाणपण "आले
आता कळते
आईचा प्रत्येक श्वास, प्रत्येक कृती
काहीतरी सांगत होती
स्वतःसाठी काहीच न करता
ती माझ्यासाठी जगत होती
आईपणाचा संवेदनेने,माझे जीवन
मी अर्पण मुलांना करते
माझी सुद्धा मुल म्हणतील का ,
'आई कुठे काय करते'?