Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Somesh Kulkarni

Inspirational

3  

Somesh Kulkarni

Inspirational

ती भेट

ती भेट

1 min
11.3K


मला भेटली कालच ती होती बसस्टाॅपवर उभी,

बरसणार होत्या पावसाच्या धारा आभाळ दाटलं होतं नभी


मीच तिला म्हणालो चल माझ्याबरोबर

पावसात भिजण्यापेक्षा माझ्या घरी येऊन थोडा आराम कर


घरात आल्याआल्या ती खुर्चीतच धापा टाकत बसली

मी लावला टीव्ही त्यावर दाखवत होते बातमी कसली


वेळ झाली होती जेवायची म्हणून दोन ताटं वाढली

दुपारीच तयार केलेली लोणच्यासोबतची खोबऱ्याची चटणीही काढली


काहीतरी बोलायचं म्हणून तिला विचारली मी तिची आवड

'मला आई आवडते' एवढंच बोलली जेवणातून काढून सवड


पत्रावळीची सवय मोडून तिनं आज ताटात जेवायला घेतलं

माझं इथूनपुढचं काहीही विचारणं तिच्या भावनांवर बेतलं


अधाशासारखं कसंबसं खात ढेकर देऊन ती झाली तृप्त

संपत आलेली बातमी तिच्या बालमनाला करत होती संतप्त


पाऊस थांबला म्हणून तिच्या घरी तिला म्हटलं सोडावं

येता येता माणुसकीच्या खात्यात आणखी एक नातं जोडावं


म्हणाली जाईन दादा मी एकटी तू काळजी करु नको

माझ्यासारख्यांना मदत करण्यासाठी कधीही मागे सरु नको


तुझे खूप खूप धन्यवाद अनाथाश्रमात राहते मी

वाईट याचंच वाटतं अशा कित्येक बातम्या दररोज पाहते मी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational