Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Vinita Kadam

Inspirational


3  

Vinita Kadam

Inspirational


दिव्यज्योत

दिव्यज्योत

1 min 11.8K 1 min 11.8K

परिचारिका हीच खरी

अभिमानाचा केंद्रबिंदू

जीवनरेषेची प्रहरी

मानवतेचा हा आत्मबिंदू ||१||


प्राणपणाने जपणारी

सुहास्य वदनी गंभीर

निर्भिड प्रेमळ सरीता

आरोग्य सेवेस खंबीर ||२||


माणुसकीचा ध्येयपट

गिरविते माय माऊली

कर्तव्यपरायण नारी

दुःखी पीडितांची सावली ||३||


दृश्य अदृश्य किटाणुशी

लढते ही रणरागिणी

गर्व न बाळगी उराशी

ती नाइटिंगेल होऊनी ||४||


यज्ञ कर्तव्याचा पेटता

समिधेसम ही झटते

सहकाऱ्यांना मार्ग दावी

कधीही ना मागे हटते ||५||


निराशेच्या या अंधारात

रुग्णांना आशेचा किरण

दिव्यज्योत होऊन राही

अनुत्साहींना दे स्फुरण ||६||


सलाम माझा या कार्याला

व्रत सेवेचे ध्यानीमनी

सन्मानाचे वाजे चौघडे

फ्लोरेन्सच्या या जन्मदिनी ||७||


रुग्णसेवा ईश्वरीसेवा

आरोग्यसेवेचा हा कणा

परिस्थिती पिडादायक

ठेवा संयमी हाच बाणा ||८||


Rate this content
Log in

More marathi poem from Vinita Kadam

Similar marathi poem from Inspirational