उदार
उदार
उदारता इथल्या मातीत वसली
माणुसकी मनामनात ठसली
मराठी माणुस जोपासतो ही वृत्ती
सामाून घेणारी इथली संस्कृती!
कला जगतात अमर ही
विज्ञानात ही नाही मागे,
धर्म व शिवबाची रांगडी शक्ती
फुले आणि स्वातंत्र्य वीरांची भक्ती!
जगात निराळी, पुढारवादी
सुधारकांची भूमी आणि लोकहितवादी
अभिमानआहे मायबोलीचाच
या ज्ञानेशाच्या मातीत जन्मल्याचा !
