Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

एक आठवण

एक आठवण

1 min
316


एक अविस्मरणीय आठवण स्टोरी मिररनी 

'नाॅनस्टाॅप नोव्हेंबर' च्या रूपाने आणली

वेगवेगळ्या विषयांची करून साठवण

स्पर्धकांची लिहिण्यासाठी ऊर्मी वाढवली १


दररोज एक कविता,कथा लिहायची

म्हणजे तेव्हा विचारांना गती मिळायची

नंतर दुसऱ्या विषयाची तयारी करायची

आणि रात्री बाराच्या आत कविता पाठवायची २


असे करून लेखनाला तर चालना मिळालीच

तीस दिवसांच्या तीस कविता लिहिल्यावर

लिखाणाचा दर्जा वाढून स्वतःला प्रेरणा मिळाली

नि प्रसन्नता आली मनाचा गाभारा भरल्यावर ४


मजल दरमजल करत प्रवास करतात

तशी आम्ही लेखनाची वाट चालू लागलो

नि कधी नोव्हेंबर महिना संपला कळलेच नाही

इतके सारे लिहिताना मनोमनी गुंतलो ५


अशी ही साहित्याने भारावलेली आठवण

कवितांच्या रूपाने कागदावर उमटली

रोजच्या रोज विचारांना प्रवृत्त करून

प्रत्येकाच्या हृदयाच्या कोंदणात जाऊन बसली ६


अशा उपक्रमासाठी स्टोरी मिररला सलाम

उपक्रमशील लेखक,कवींच्या लेखणीला

भरभरून दाद आठवणींच्या साठवणीसाठी

आणि त्रिवार वंदन लिहिण्याच्या उमेदीला ७


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational