अंधश्रद्धा एक समज..
अंधश्रद्धा एक समज..
काय श्रद्धा श्रद्धा म्हणू श्रद्धा मनाची गुंफण
श्रद्धा कुबेराचं धन, श्रद्धा देव,देवपण
अंधश्रद्धेचं प्रतीक काळी मांजर आडवी जाणं
काय मांजराचा दोष, काळ माणसाचं मन
घरावरच्या टोकाला कावळ्याचं आगमन
मनमोकळ्या घराला पाहुण्यांचं दडपण
काय घर घर म्हणू सोन्यासारखं सदन
सोन्यासारख्या घराला लिंबू मिर्चीची तोरणं?
आता पुरे हं माणसा, पुरे तुझं आंधळेपण
सुंदरश्या जीवनाचं कर श्रद्धेने पूजन!
