कुटुंब-अविस्मरणीय क्षण..!
कुटुंब-अविस्मरणीय क्षण..!
1 min
528
काही चुकलंही तरी बाबा मिठीत तू घेशी
आता वरवर भाव अन दिसेनाशी प्रीती
बोट धरून दादाने सारी दुनिया दाखविली
विश्व माघारी सोडाया त्याने गाडी शिकविली
ती परी ताई केव्हा झाली, ताई आई केव्हा झाली
कळलेच नाही मला, ताई बाई केव्हा झाली
डगमगलो कितीही तरी पदर घट्ट होता आईचा
बाळ मोठं किती झालं नाईलाज हो आईचा
किती गोड आठवणी जपू माझ्या स्मरणिकेत
संपू नये असे क्षण आयुष्याच्या मालिकेत..!
