STORYMIRROR

Piyush Lad

Others

3  

Piyush Lad

Others

~आई बाबा~

~आई बाबा~

1 min
331

आई समाईची वात आहे,दुधाचे दात आहे,या कवितेची सुरुवात आहे

बाबा कौतुकाची थाप आहेत,

धडधडनारी धाप आहेत,

सुरांचा आलाप आहेत


आई छाया आहे,

माया आहे,

गुन्ह्यावरची दया आहे

बाबा छत आहेत,

व्रत आहेत,

बाबा आईच्या नाकाची नथ आहेत


आई गोरी आहे,

लोरी आहे,

बाबां पर्यंत पोहोचणारी दोरी आहे,

बाबा सावळे आहेत,

भोळे आहेत,

जिथे मी माझे संपूर्ण 

भविष्य पाहू शकतो असे डोळे आहेत


आई मार आहे,

धार आहे,

मनाचा आकार आहे

बाबा लाथ आहेत,

साथ आहेत,

शरीराची कात आहेत


आई गोड आहे,

नात्यांची जोड आहे,

तव्याच्या चटक्याचा फोड आहे

बाबा लळा आहे,

सुविचारांचा फळा आहे,

अनुभवाच्या त्रासाच्या 

कळा आहेत


आई खंत आहे,

भ्रांत आहे,

न संपणाऱ्या त्रासाचा अंत आहे

बाबा आराध्य आहेत,

पद्य आहेत,

नावाचा मध्य आहेत


आई मंदिराची आरास आहे,

पुष्पाचा सुवास आहे,

दृढ असा विश्वास आहे

बाबा शिकवणींचा गट आहेत,

संकटांची घट आहेत,

आणि बाबाच आहेत 

जे या कवितेचा शेवट आहेत..!


Rate this content
Log in