नका येऊ राजे पुन्हा..!
नका येऊ राजे पुन्हा..!
नका येऊ राजे पुन्हा होणे सुधार नाही
जणू बहुरूपी तोच तुमचा पण तुमचे विचार नाही
झाली अफाट गर्दी नुसतीच रक्षकांची
पण दुर्गास आत शिरण्या उरलेच द्वार नाही
दानही होता धर्म एक हे विसरून लोक गेले
उपकार फक्त त्यांचे आता कुणीही उदार नाही
हृदयात थेट जाते आता कट्यार त्यांची
काळापरी हो तुमच्या देहात वार नाही
इतिहास आज होतो बलात्कारी नराधमांचा
नुसतीच ती कहाणी कुठलाच सार नाही...!
