निरोप~त्या मित्रांचा,दिवसाचा!
निरोप~त्या मित्रांचा,दिवसाचा!
1 min
398
सूर्याच्या त्या दिव्याचा उत्साह पहिला मी
ते तेल वात सारे, अन दीप जाहलो मी
ते जळती मशाल सारे, अन मी अग्निराख होतो
बांधून आठवणींना आता निरोप घेतो
गप्पांत रंगली मी, रात्री तुझ्यासवे रे
स्मरूनी जुन्या क्षणांना, अश्रूंत शिंपले रे
आकार तू मनाचा, अन मी शरीर होतो
सरली सकाळ सारी आता निरोप घेतो..!
