Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vanita Shinde

Inspirational

4  

Vanita Shinde

Inspirational

52आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा

52आठवडे लिखाण आव्हान स्पर्धेसा

1 min
311


पहाटे अवतिर्ण होणा-या 

दवबिंदू सारखे अवतरले,

शिवाजी महाराज या भूतलावर.

विविध जाती धर्मासाठी

झिजले,खपले,आयुष्यभर.


समानतेची,मानवतेची अन्

एकतेची शिकवण देत,

काळ्याकुट्ट अंधारात, 

जाती धर्माची चादर पांघरलेला

निद्रिस्त समाज अहोरात्र जागवला.

राष्ट्रकार्यापुढे आपल्या देहाची ते

राख करुन, मातीत मिसळूनही गेले.


समाज आता जागा झालाय,

पण शिवबाचा वारसा विसरलाय. 

एकता सोडून जाती धर्म माजलेत.

गल्ली बोळात सर्वत्र निळे,हिरवे,

भगवे, पिवळे झेंडे एका हातात अन् 

दुस-या हातात नंग्या तलवारी घेवून,

स्व जातीचा वारसा चालतोय.


माणुसकी विसरुन, समानतेची

शिकवण जणू लयाला गेलीय.

स्वराज्यातच फुट पडलीय.

राजांच्या विचारावर गधा आलीय.

शिवाजी राजांचे विचार जर

आपणही अंगिकारले तर

खरंच आखिल मानव जात,

त्या पहाटेच्या दव बिंदूसारखीच,

सुर्यप्रकाशात चमचमत राहिल.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational