STORYMIRROR

Mitali More

Inspirational

4  

Mitali More

Inspirational

तरुण भारताचा

तरुण भारताचा

1 min
185

तू तरूण भारताचा

निजला असा कसा रे

तोड जातीयतेच्या बेड्या

उठ लढ माणसा रे


जीव गेला त्याचा

जो लढला एकट्याने

एक केलं मानवाला

परकीय संकटाने


वेगवेगळे तीन रंग

आनले तिरंग्यात एक

भारतमाता ही सुंदर

जरी रंगछटा अनेक


परकीय संकटाचे

संपले ते युद्ध जरी

जातीयतेची कीड

अशी लागली जिव्हारी


मतभेद असले तरीही

मनभेद नको रे आता

मनी ठेव भारतमाता

तिच्या चरणी टेक माथा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational