स्वातंत्र्याच्या नभात
स्वातंत्र्याच्या नभात
स्वातंत्र्याच्या नभात उधळू चांदणे आनंदाचे
बंधनाच्या बेड्या तोडून स्वप्न पाहू उद्याचे
बंधिस्त पाखरांना निळ्या नभात सोडू
अज्ञानाच्या साखळ्या ह्या शिक्षणानेच मोडू
तलवार लेखनीची,बनवू ढाल शिक्षणाला
एकजूटीने लढून हरवू जातीय संकटाला
करू वंदन त्या हुतात्म्यांना ज्यांनी दिले बलीदान
आटवून रक्त सारे वाचविले दीन जनांचे प्राण
तिरंग्याला देऊ सलामी एकत्र होऊन सारे
पुन्हा घराघरांत वाहतील स्वातंत्र्याचेच वारे
