आशीर्वाद
आशीर्वाद


जय जिजाऊ। जय शिवराय। जय शंभुराजे।
आशीर्वाद घ्यावासा वाटतो, या सह्याद्रीच्या खोऱ्याचा
राजांच्या पाठीशी भक्कम राहणाऱ्या, दुर्ग दुर्गेश्र्वराच्या पायरीचा
आशीर्वाद घ्यावासा वाटतो, साऱ्या मावळखोऱ्याचा
नी एका हाकेला जीव ओवाळणाऱ्या, मर्द मराठी मावळ्यांचा
आशीर्वाद घ्यावासा वाटतो, पाचाडच्या त्या पुण्यवंत समाधीचा
स्वराज्याचा वाघ घडवणाऱ्या, त्या महान स्वराज्य जननीचा
आशीर्वाद घ्यावासा वाटतो, त्या पुरंदरच्या बालेकिल्ल्याचा
धर्मवीर त्या छाव्याच्या जन्माने, पवित्र झालेल्या मातीचा
आशीर्वाद घ्यावासा वाटतो, या महान महाराष्ट्राचा
मराठ्याचे रक्त कणाकणात असलेल्या, या माझ्या मातृभूमीचा
आशीर्वाद घ्यावासा वाटतो, माझ्या स्वराज्याच्या धन्याचा
सुवर्ण सिंहासनी विराजलेल्या, साऱ्या रयतेच्या छत्रपतींचा