अनामिक ओढ
अनामिक ओढ
अनामिक ओढ तुझी
सखे मनाला लागली
तुझ्या प्रीतीच्या सागरात
हि माझी नाव तरंगली.....
तुझं लोभस रूप प्रिये
या डोळ्यांत साठलेलं
तू नभीची चांदनी असावी
तुला पाहताक्षणी वाटलेलं.....
चांदणी साजते नभात
तू माझ्या मनात
अवीट गोडी मधाची
सखे तुझ्या प्रेमात.....
तू फक्त माझीच असावी
मला बघतांना हसावी
कायम या हृदयात
तुझीचं प्रतिमा दिसावी.....

