विरह
विरह
तुज भेटण्या जीव असुसातो,तुटतो,
तू नसता जावळी का होई कासावीस
तुझी आठवण जणू विरहाचा डोंगर,
तुज नित्य भेटावे ही जीवाची आस...
तुज पाहता नयन सुखावती..,
हृदयाची स्पंदने तुझी नि माझी जुळती.
तुझी चाहूल ही लागता ह्या हृदयी,
जीव वेडवतो,काहूर माजते मनी..
लागे भेटीची ओढ तू नसता जावळी,
स्पर्शूनी जाई मन होई कावरेबावरे..
तुझी ती रम्य नजर आजही आठवे,
तुझ्या त्या नटखट नजरेचा खेळ....
हा जीवघेणा विरह,कधी संपेल रे वेड्या,
आस जीवा लागलीसे भेटण्यास मना.
अरे सख्या तुला नाही का येत रे आठव,
माझ्या हुरहुरलेल्या, बावऱ्या हृदयाची..

