प्रेम
प्रेम
आज पुन्हा नव्याने तुझी आठवण झाली,
अन् नयनी माझ्या अश्रू दाटले....
तुझे असणे माझे अस्तित्व आहे,
तुझ्यात मी अन् माझ्यात तू......
सांग ना रे सख्या का आहे असा दुर तू,
नको तो विरह अन् नको तो दुरावा...
आठवते का तुज ती अपुली पहिली भेट
अन् हात हाती घेऊनी थेट....
नजरे नजरेतला तो खेळ जीवघेणा,
मनीच्या अंतरी गूढ वसलेला....
अबोल मनीचे भाव कधी कळतील तुला,
न बोलताही नयनांचे खेळ कळतील तुला
हृदयाची स्पंदने कधी जुळतील का रे,
तू दूर का असा, जवळी येशील का...
माझ्या मनीचे प्रेम समजेल का तुला,
माझ्या मनीचे प्रेम समजेल का तुला..

