तिचे भयंकर रहस्य....
तिचे भयंकर रहस्य....
ती एक रहस्यमय होती....
आज इथे तर उद्या तिथे.....
कधी कोणा दिसे,तर कधी गायब....
अजबच होते सगळे तिचे रसायन....
दुरून दिसे, जवळ जाता नसे....
काय म्हणावे ह्या रहस्याचे......
कोणी म्हणे भूत, तर कोणी म्हणे चेटकीण....
कोणी म्हणे आत्मा, तर कोणी म्हणे भास....
ती भास होती की, आभास कळेना काही..
क्षणात असते अन् क्षणात नसते....
काय भयंकर रहस्य होते समजेना कुणा..
हा तर सारा नजरेचा खेळ होता.....
ती तर होती म्हणे भटकती आत्मा...
कधी झाडावर वसे, तर कधी घरावर..
काय सत्य अन् काय खोटे....
होतेच सारे नजरे समोर....
एक न कळणारे गुपित.....
न कळणारे कोडे.....
जसे न उमगणारे भयंकर रहस्य....

