चांदणं फुललं माझ्या अंगणी....
चांदणं फुललं माझ्या अंगणी....
रम्य या पुनव चांद रातीला,
तुझा हात माझ्या हातीला...
बघ ना सख्या अंगणी माझ्या,
रातराणीच्या बहरलेल्या सुगंधाला...
सडा शिंपला अंगणी फुलांचा,
जणू पुनवेचा चंद्राचं अंगणी अवतरला
आज पुन्हा या रम्य पुनवेचा चांदण्यात,
तू अन् मी घेऊन हत हाती अंगणात...
गूज गोष्टी चाले या चांद रातीला,
ही निरव शांतता,अपुल्या प्रीतीला...
बघ बहरलेली रातराणी अपुल्या संगतीला
दुरून पाही पुनवेचा चंद्र अपुल्या भेटीला
आज तुझ्यासवे चांदणं फुललं माझ्या अंगणी,
रम्य ही पुनवेची रात जणू खुलली अँगणीला...

