विवाहाचा विषय
विवाहाचा विषय
विवाहाचा विषय होता
रात्री मला स्वप्न पडलं
मिठीत होतीस तू माझ्या
तुझं माझं मिलन घडलं || 0 ||
हनीमूनची रात्र होती
तूला मिठीत मी घेतलं
हळूच तूला स्पर्श करून
तुझं मी लक्ष वेधलं
हृदय तुझं अधीरतेने
का असं धडधडलं
मिठीत होतीस तू माझ्या
तुझं माझं मिलन घडलं || 1 ||
तुझ्या नरम स्पर्शातही
पवित्र प्रेमभाव होता
माझ्या अधीर मनावर
फक्त तुझा प्रभाव होता
विजेच्या लख्ख प्रकाशाने
आकाश ही कडकडलं
मिठीत होतीस तू माझ्या
तुझं माझं मिलन घडलं || 2 ||

