STORYMIRROR

Raakesh More

Romance

3  

Raakesh More

Romance

मंगळसूत्र

मंगळसूत्र

1 min
145

तुझ्या गळ्यात मंगळसूत्र 

घालतोय मी 

तुझ्या केसात गजरा 

माळतोय मी || 0 ||


किती क्षण सुंदर हे 

तुझ्या माझ्या विवाहाचे 

दोन जीव एकत्रित 

वाहणाऱ्या प्रवाहाचे 

प्रेमातले सारे नियम 

पळतोय मी 

तुझ्या केसात गजरा 

माळतोय मी || 1 ||


असं वाटतं आजच 

भेटलोय तूला 

किती गोड दिसतेस 

माझ्या लाजणाऱ्या फुला 

अजूनही तुझ्यावर 

भाळतोय मी 

तुझ्या केसात गजरा 

माळतोय मी || 2 ||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance