डोळ्यांनी
डोळ्यांनी
लाजवंती सांजवेळी लाजली डोळ्यांनी
भेटण्याची आर्तता ही दावली डोळ्यांनी
तोड राणी तू अबोला जीवघेणा आता
रानचाफ्याशी अबोली बोलली डोळ्यांनी
तू नशेची बाटली आहेस का लावण्या
दोन प्याल्यांची नशा मज पाजली डोळ्यांनी
आसवांना तूच माझ्या चुंबिले ओठांनी
मग सुनामी भावनांची रोखली डोळ्यांनी
संपला अंधार सारा साजणी आल्याने
वीज माझ्या काळजावर पाडली डोळ्यांनी

