तू येशील तेंव्हा
तू येशील तेंव्हा
तू येशील तेव्हा तुझ्यासोबत
खूप बोलणार आहे
मनातली सारी गुपितं
नक्कीच खोलणार आहे || 0 ||
तू गेल्यापासून
चैन नाही मनाला
आधार नाही तुझ्याविना
काही जीवनाला
तूला भेटून हृदय माझं
नक्कीच डोलणार आहे
तू येशील तेव्हा तुझ्यासोबत
खूप बोलणार आहे || 1 ||
किती प्रेम केलंय
दाखवायचं आहे तूला
माझ्या निर्मळ प्रेमात
माखवायचं आहे तूला
माझं प्रेम हृदयाशी
तुझ्या तोलणार आहे
तू येशील तेव्हा तुझ्यासोबत
खूप बोलणार आहे || 2 ||

