STORYMIRROR

Raakesh More

Romance

3  

Raakesh More

Romance

सहचारिणी

सहचारिणी

1 min
150

तूला माझी सहचारिणी 

बनवण्याचा पण आहे 

विचार केलाय लग्नाचा 

हाच सुंदर क्षण आहे || 0 ||


किती मोहक क्षण असेल 

तू माझ्या मिठीत असशील 

विराजमान होऊन माझ्या 

हृदय आसनावर बसशील 

तुझ्या विचारात मग्न 

माझा कणकण आहे 

विचार केलाय लग्नाचा 

हाच सुंदर क्षण आहे || 1 ||


तुझ्या जीवनात येण्याने 

बहरून गेलं जीवन माझं 

कालपर्यंत चं सारं जीवन 

जुनं जीर्ण झालं ताजं 

विहर मुक्तपणे तू 

माझं हृदय प्रांगण आहे 

विचार केलाय लग्नाचा 

हाच सुंदर क्षण आहे || 2 ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance