STORYMIRROR

Manisha Wandhare

Romance

3  

Manisha Wandhare

Romance

पावसात ती धुंद झाली...

पावसात ती धुंद झाली...

1 min
212

हिरवीगार पायवाट ही,

आज ओलीचिंब झाली,

मेघ जो बरसला बेधुंद इथे ,

पावसात ती धुंद झाली ...

गारवा स्पर्शूनी जाता,

अंगावर शिरशीरी आली ,

मिठी ती उबदार होती मगाशी,

आठवुण उब मनाला मिळाली ...

मुसळधार सर पावसाची,

हिरवळ जणू पानातून पाझरली,

चढता रंग मेंदीचा,

प्रिया प्रेम रंगात नाहली ...

थेंब थेंब झरता ओल आली ,

झिरपून थंडी गुलाबी झाली,

हा रंग चढला आता मनावर ,

रंगात चढणारी ही बरसात झाली ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance