मोगरा
मोगरा
मोगरा फुलला
चेहरा खुलला
मन वा-यावर
झोपाळा झुलला
मोगरा हसतो
चेहरा दिसतो
मनात ठसतो
ह्दयात बसतो
मोग-याचा गंध
सुटला सुगंध
मनाचे रे बंध
दाटला आनंद
मोगरा पहातो
तुला विचारतो
केसात माळतो
गंधात बांधतो
मोगरा रुसला
एकटा बसला
नाराज दिसला
पाहुण हसला

