काळजात शिरून बघ
काळजात शिरून बघ
प्रेम ओसंडून
केलंय तुझ्यावर
काळजात माझ्या
शिरूर बघ
तुझी पाठमोरी
आकृती बघतोय
मागे एकदा
फिरून बघ || 0 ||
तुझ्याच नावाची
माळ जपणं
तुझ्याच नादात
माझं जगणं
निसर्गाच्या सौंदर्यात
फक्त फक्त
तुलाच बघणं
तुझ्या नावाने
धडधड करतंय
काळजात एकदा
विरून बघ
तुझी पाठमोरी
आकृती बघतोय
मागे एकदा
फिरून बघ || 1 ||

