STORYMIRROR

Raakesh More

Romance

3  

Raakesh More

Romance

कशाला

कशाला

1 min
134

कशाला तोंडावर बोट ठेवतेस 

कुणाला काही कळणार नाही 

जीवनात व्यस्त आहेत लोक 

आपल्याकडे वळणार नाही || 0 ||


इतकी भिती मनात कशाला 

प्रेम स्वच्छंदपणे कर 

प्रेम केलंय आपण निर्मळ 

कशाला कुणाची हवी डर 

लोकांपर्यंत स्टोरी आपली 

कधीही ओघळणार नाही 

जीवनात व्यस्त आहेत लोक 

आपल्याकडे वळणार नाही || 1 ||


नजरेपासून लोकांच्या 

तूला मी ठेवीन जपून 

मजा घेऊ प्रेमाची 

या लोकांपासून लपून 

आपलं प्रेम दुनियेच्या 

कुरघोडीवर आदळणार नाही 

जीवनात व्यस्त आहेत लोक 

आपल्याकडे वळणार नाही || 2 ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance