यातना
यातना
कश्या दाखवू तुला या
मनातील दुःख वेदना
जातो दूर तू जेव्हा जेव्हा
होतात मनाला किती यातना ….
दुरावतोय जरी देह हा
मन आहे तुझ्यापाशी
जगता येईल का असं
किती भांडावं नशीबाशी ….
राहिली जशी अधुरी
राधा कृष्णाची प्रीत
प्रेमाच्या दुनियेतली
अशी वेगळी का रीत ……

