STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Inspirational

4  

Ganesh G Shivlad

Inspirational

तू कृष्ण सखा होऊन जा..!

तू कृष्ण सखा होऊन जा..!

1 min
415

जर असेल सामर्थ्य,

मित्रा तुझ्या अंतकरणात,

तर थोड औदार्य दाखवायला,

काय हरकत आहे..?


सुदामा सारखा एक मित्र,

आत्मसन्मानाने जगेल, 

असा कृष्णसखा तूच होण्यास,

काय हरकत आहे..?


अरे मित्रा, गोष्ट आहे ही,

खुप महत्वाची आणि मोठी,

जरा ऐक.. सांगेन मी तुला,

करून ती, सोपी अन् छोटी..!


नको पंचपक्वान्न थाळी त्याला,

नको तूप, पुरणपोळी,

कांदा, चटणी, भाजीभाकरी,

हीच त्याची गोड पोळी..!


नको बायका मुलांना त्याच्या,

भरजरी रेशमी कपडेलत्ते,

हवी त्यांना वस्त्रे साधी सूती,

केवळ अंग झाकण्या पुरते..!


नको उंच माडी रे त्याला,

नको रे महाल सोन्याचा,

साधेसुधे छप्पर चालेल,

जपता येईल संसार सोन्याचा..!


नको नरम गरम गादी त्याला,

नको रे मखमली गालिचा,

धरणी मायची कुस उबदार,

भासे बिछाना भारीचा..!


नको हिरे माणिक मोती त्याला,

नको रे सोन्याचा गाव,

हवाय त्याला केवळ,

त्याच्या शेतात पिकलेल्या सोन्याला भाव..!


आहे तुझ्यात सामर्थ्य मित्रा,

तर तूच कृष्णसखा होऊन जा,

वाट पाहतोय एक सुदामा,

मित्रा तू जरा औदार्य दाखवून जा..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational