वारकरी.....!!
वारकरी.....!!
आताच तर कुठे, जगायचे शिकलो
चांगले निवडून, वेचायचे शिकलो...!
असे तसे आणिक, कमी रमी सोडून
आहे त्यात आनंद, मानायचे शिकलो....!
गोड तसेच कडू, ऊन आणि सावली
जीवनाचे रे भाग, जाणायचे शिकलो....!
आले त्यांना सोबत, गेले त्यांचा विसर
पाण्यावाणी नितळ, वागायचे शिकलो...!
पाण्यामध्ये कमळ, आकंठ ते बुडाले
तरी नामानिराळे, रहायचे शिकलो....!
कशापायी तो ध्यास, करायचा हव्यास?
लोभाचा तो दुःश्वास, करायचे शिकलो...!
पांडुरंगा कारणे, आलो आम्ही भूवरी
जीवन सत्कारणी, लावायचें शिकलो...!
आता एकची ध्येय, जाणे असे वैकुंठी
पुण्याच्या मग गाठी, बांधायचे शिकलो...!
एक नाम केशवा, दूजा भाव नसावा
हरी नामे गोडवा, रमायचे शिकलो....!
