MAHENDRA SONEWANE

Inspirational

4  

MAHENDRA SONEWANE

Inspirational

आईची माया

आईची माया

1 min
263


माया आईची कितीही , 

राही जग तिच्या पाया । 

काही दैवत दुसरे , 

आई सम नाही माया ॥ 


    आई मुलासाठी आहे , 

    अशी वात्सल्याची मूर्ती । 

    तिने दिले हे संस्कार , 

    तिची आयुष्यात किर्ती ॥ 


तिचा प्रेमाचा आधार , 

होता आम्ही डोक्यावरी । 

तोच आशिष आमचा , 

सांभळतो आजवरी ॥ 


    माझ्या आईचे ते प्रेम , 

    निरंतर मिळे आम्हा । 

    तिच्या सावलीत आम्ही , 

    सुख देतो आहे तुम्हा ॥ 


किती कष्ट केले तीने,

चिंता मुलांसाठी केली । 

तिचं काळीज अफाट ,

सदा ममताच दिली II


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational